महात्मा फुलेंच्या स्मृतीदिनानिमित्त हनुमान नगरमध्ये वैचारिक प्रबोधन ! ..

  48

  ?तात्यासाहेब हेच खरे मर्यादा पुरुषोत्तम – प्रा.भरत शिरसाठ 

  ?महात्मा फुले यांचे जीवन म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत – पी.डी.पाटील

  ?महात्मा फुले नसते तर शिवराय कळले नसते!.. – लक्ष्मणराव पाटील 

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

  धरणगांव(दि.29नोव्हेंबर): – २८ नोव्हेंबर, २०२१ रविवार रोजी हनुमान नगर मित्र परिवार, बहुजन क्रांती मोर्चा आणि सत्यशोधक परिषद धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हनुमान नगर येथे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले.या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सल्लागार पंच हेमंत माळी सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे ज्येष्ठ पंच सखाराम दुला महाजन होते. या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्रा.भरत शिरसाठ, पी.डी.पाटील, लक्ष्मणराव पाटील होते.

  सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
  प्रथमतः वक्ते पी.डी. पाटील यांनी तात्यासाहेबांचा जीवनपट सांगून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवन कार्य अतिशय प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केले. दुसरे वक्ते लक्ष्मणराव पाटील यांनी तात्यासाहेब नसते तर? या विषया संदर्भात वेगवेगळे उदाहरण दाखले देऊन तात्यासाहेबांच कार्य विशद केले. शिवराय व भिमराय यातील दुवा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होय, असे प्रतिपादन केले.

  व्याख्यान पुष्पाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.भरत शिरसाठ यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य व सत्यशोधक समाज यावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता ही मूल्ये जोपासली पाहिजे, हीच खरी तात्यासाहेबांना आदरांजली ठरेल. तात्यासाहेब हेच खरे मर्यादाबपुरुषोत्तम आहेत, असे प्रतिपादन प्रा. शिरसाठ यांनी केले.या प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमंत माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल महाजन, दीपक मराठे, निलेश महाजन, आप्पा महाजन, राहुल खैरनार, महेश माळी, कन्हैया महाजन, समाधान पाटील, तुषार माळी, सचिन महाजन, महेश मराठे, परमेश्वर महाजन, अजय पाटील, विजय महाजन, तसेच हनुमाननगर मित्र मंडळ, जय बजरंग व्यायाम शाळा यांमधील सर्व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.

  याप्रसंगी ओबीसी मोर्चा चे राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी समाजाचे सचिव गोपाल माळी, सहसचिव डिगंबर माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, प्रोटान शिक्षक संघटनेचे सुनील देशमुख , गणेश सूर्यवंशी, सुधाकर मोरे, जाधव सर, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, तसेच बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.