राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनाला उत्तम प्रतिसाद

27

चिमूर (पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क)

गांधी सेवा शिक्षण संस्थाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात आयक्युएसी अंतर्गत आंतरविद्याशाखीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्तिमत्व आणि कार्य या विषयावर वेबीनारचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सय्यद निसार सय्यद , प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव विनायकराव कापसे होते. आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात सापडले आहे. अश्यावेळी मन शरीराला सांभाळणे अवघड असते. म्हणून मार्गदर्शकांची भुमिका महत्वाची होती. भारतीय संत परंपरेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या अस्मानी उस्मानी संकटातून तरुण जाण्यासाठी आहे. करिता या वेबीनारचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य कार्तिक पाटील यांनी या वेबीनारचा उद्देश विषद केला.वर्तमानकाळातमहाराजाच्या विचाराची गरज महत्वाची आहे, त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे. यावरथोडक्यात प्रकाश टाकला.

या वेबीनारच्या प्रथम सत्रात रुपराव वाघ (माजी उपसर्वाधिकारी गुरुकुंज मोझरी )यांनी आपल्या भाषणात राष्ट्रासंताचे साहित्य एक चिंतन यावर मनोगत व्यक्त केले. राष्ट्रसंताच्या साहित्यातील दृष्टेपणा उलगडून दाखविले. ज्ञानेश्वर रक्षक प्रवर्तक राष्ट्रसंत विचारधारा यांनी आपल्या मार्गदर्शनातुन राष्ट्रसंताच्या गुरुदेव सेवा मंडळाची संकल्पना आणि विश्वशांती हा विषय सहजसोप्या पद्धतीने मांडला. वर्तमानकाळातील गुरुदेव सेवा मंडळाची जबाबदारी व कर्तव्य सांगितले. द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. सुलभा पिंजरकर,(गुणवंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय पुसद )यांनी राष्ट्रसंताच्या विचारातील महिलोन्नती संस्काराचे बोधामृत या विषयावर विचार मांडताना महिलेच्या उन्नतीविषयी विचार राष्ट्रसंताचे काळाच्या पुढे होते असे स्पष्टपणे सांगितले. तसेच दुस-या विचारपुष्प सत्रात प्राचार्य डॉ. राजेंद्र जाने यांनी राष्ट्रसंताच्या स्वप्नातील आदर्श खेड्याची संकल्पना या विषयावरराष्ट्रसंताचे आदर्श गावासंबंधीचे विचार मांडले. गावावरूनच जगाच्या विकासाचे गणित ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. गुबळे, आशा साखरकर यांनी राष्ट्रसंताच्या विचाराशी भजने सादर केली. तसेच विदर्भ शासकीय महाविद्यालय अमरावतिचे डॉ.दिवसे यांनी ” हर देश मे तु, हर भेष मे तु ” हे भजन सादर केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. सय्यद निसार सय्यद सर यांनी राष्ट्र्संताचे समाज उपयोगी विचार व वर्तमानकाळाची उपयुक्तता यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रावंदनेने झाली.

कार्यक्रमासवेबीनारसाठी ३४० लोक सहभागी झाले होते आणि आपले संशोधन पेपर १६० जनानी पाठवून सक्रीय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास गांधी सेवा शिक्षण समिती अध्यक्ष दिपक यावले यांनी शुभसंदेश दिला. या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. प्रफुल राजुरवाडे, प्रा. राजेश्वर रहांगडले, प्रा. पितांबर पिसे, प्रा. आशुतोष पोपटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा समारोप प्रा. पितांबर पिसे यांनी केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रफुल्ल बन्सोड, डॉ. हरेश गजभिये, डॉ. लक्ष्मन कामडी, डॉ. नितीन कत्रोजवार, डॉ. उदय मेंडूलकर, प्रा. राकेश कुमरे, प्रा. रोशन कुमरे, प्रा. वाघमारे तसेच शिक्षकेतर कर्मचा=यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.