अर्हेरनवरगाव येथील आरोपीस खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप

  42

  ?जादूटोणा केल्याच्या संशयावरून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

  ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

  ब्रम्हपुरी(दि.2 डिसेंबर):-मौजा अर्हेरनवरगाव येथील आरोपी आशिष उर्फ दादू अतुल देवतळे वय 20 वर्ष रा. अर्हेरनवरगाव याने मृतक महादेव भागडकर याचे मुलीची छेडखानी केल्यावरून त्याच्या मुलांनी आरोपीला मारहाण केली होती हा राग मनात ठेवून तसेच मृतक महादेव भागडकर हा जादुटोणा करतो या संशयावरून आरोपी आशिष उर्फ दादू अतुल देवतळे हयाने दि. 13/10/2013 रोजी अंदाजे साडेसहा वाजे दरम्यान मृतक महादेव भागडकर हा घरामध्ये एकटाच खाटेवर झोपून असल्याची संधी साधून त्याचे घरात प्रवेश करून त्याचेवर कुऱ्हाडीने वार करून जिवानिशी ठार केले. मृतक महादेव भागडकर यांचा मुलगा श्रीकांत महादेव भागडकर याने दिलेल्या फीर्यादवरून पो.स्टे ब्रम्हपुरी येथे अप क 134/2013 कलम 302,450 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक योगश पारधी पो. स्टे ब्रम्हपुरी यांनी सदर गुन्हयाचा तपास करून आरोपी आशिष उर्फ दादू अतुल देवतळे वय 20 वर्ष रा. अर्हेरनवरगाव याचे विरूद्ध दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.

  सदर खदल्याच्या अंतीम युक्तीवादानंतर मा.व्ही.डी केदार साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश -01 चंद्रपूर यांनी भादवी चे कलम 302,450 भादवी नुसार आरोपी आशिष उर्फ दादू अतुल देवतळे वय 20 वर्ष रा.अर्हेरनवरगाव यास दोषी ठरवून त्याला भादवीचे कलम 302 अंतर्गत जन्मठेप तसेच 5000 रु दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावास तसेच भादवी कलम 450 अंतर्गत पाच वर्ष शिक्षा व 2000 दंड, दंड न भरल्यास तीन महीने अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

  सदर खटल्यात एकूण बारा साक्षीदार तपासले गेले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील श्री संदीप नागपूरे यांनी युक्तीवाद केला तसेच पैरवी अधिकारी म्हणून पो. हवा श्री रामदाय कोरे बनं 414 पो.स्टे ब्रम्हपुरी यांनी कामकाज पाहीले.मग