दिंडोरी तालुक्यात अकरा वर्षाच्या मुलाचे अपहरण

48

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

दिंडोरी(दि.2डिसेंबर):-तालुक्यातील मुरली येथील अकरा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा मुलगा गेल्या पाच दिवसापूर्वी बेपत्ता झाला होता मात्र त्याची अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली असून वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलातर मुलास परमोरी परिसरातून अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून पळून नेल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की परमोरी येथील विशाल श्रावण गुंबाडे हा अकरा वर्षाचा मुलगा 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लखमापुर फाटा येथून परमोरी गावाकडे एक मित्रासोबत येत असताना हेल्मेट घातलेल्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्या काहीतरी फूस लावत त्यास दुचाकीवरून बसवून घेऊन गेला संध्याकाळी तो घरी न आल्याने आईवडिलांनी चौकशी करत शोधाशोध केली नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो सापडला नाही अखेर वनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे