विभागीय आयुक्त साहेब गेवराई मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना न्याय द्या – सुनील ठोसर

  49

  ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

  गेवराई(दि.3डिसेंबर):-विधानसभा कार्यक्षेत्रातील शेतकरी, दिव्यांग विविध घटकातील पात्र लाभार्थी वंचित ठेऊन, डावलून काही स्थानिक नेते , गावातील वेगवेगळ्या पार्टीचे कार्यकर्ते याना राजकीय पक्षांनी बळ देत गोरगरिबांच्या हक्काचे घरकुल,निधी, गावच्या विकासासाठी आलेला निधी, साहित्य खरेदी नावे तसेच कामाच्या नावाखाली कोटी रुपयांचा घोटाळा करून, सिंचन विहीर आदी योजनांच्या माध्यमातून स्वतचं घर भरण्याचे तसेच घरातील वेगवेगळ्या नावे अनेक योजनांचे लाभार्थी होण्याचीच काम करत सर्व सामान्य माणसाला फसविण्याचा गोरज धंदा सुरू करण्यात आला असून गेवराई,माजलगाव, बीड तालुक्यातील नगर परिषद, पंचायत समितीच्या वतीने ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून साजरा करत सन्मान करून त्यांच्या हक्काचे पाच टक्के निधी,घरकुल, नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत गाळे, दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी बिजभांडवल अर्थ सहकार्य आदी योजना तत्काळ करण्यात याव्यात.

  घरकुल योजना गरजू लोकांना तसेच सिंचन विहिरी पात्र लाभार्थी याना अधिकारी व स्थानिक नेते यांनी आपापल्या पातळीवर वाटून घेत घरातील वेगवेगळ्या नावे देत गरजू लोकांना केवळ वेठीस धरून, भुल थापा मारल्या केवळ असेवर ठेवत हाडपण्याचा कार्यक्रम सर्रास पहावयास मिळत असल्यामुळे याची विभागीय आयुक्त साहेब यांचेकडे विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. २०२९-२०२१ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीचा साहित्य खरेदी मधील घोटाळा तसेच झालेल्या कामाचे चावडी वाचन करून बोगस कामे यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. गेवराई तालुक्यातील बोगस अकृषी परवानगी परवाने देणाऱ्या अधिकारी ते दस्त नोंदणी करणार रजिस्टर,बिल्डर,विक्रेते यांनी प्लॉट खरेदीदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी ४२० चे गुन्हे दाखल करण्यात यावे.

  गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील शेतकरी कृष्णा राजाभाऊ गायके वय २३ वर्ष यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व सावरगाव येथील नादुरुस्त व खाली असलेल्या रोहित्र तार मुळे माजी सरपंच यांचा मुलगा शॉक लागून जागीच मृत्यू झाला सदरील घटनेला महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित असण्यामुळे दोषी महावितरणचे अभियंता,इंजिनियर,लाईनमन यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , चालू वर्षाचे नुकसान भरपाई शासामार्फत दिवाळी भेट देत असताना अद्यापही वाटप करण्यात सुरुवात झाली नसून बँक प्रशासनावर कार्यवाही करण्यात यावी तालुक्यातील फळबाग शेतकरी बांधवांना डावलून हजारो शेतकरी वंचित ठेऊन कृषी विभागाच्या वतीने कोटी रुपयांचा निव्वळ घोटाळा बाजार सुरू आहे.

  याची सखोल चौकशी करण्यात यावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त साहेब याना रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांचे वतीने विनंतीपुर्वक लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास गेवराई पंचायत समितीच्या समोर हलगी वाजून आंदोलन करण्यात येईल करिता मुख्यमंत्री साहेबांकडे, गृहमंत्री साहेब,उप विभागीय पोलिस अधिकारी साहेब, तहसील कार्यालय गेवराई, दी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदींना कळविण्यात आले तालुक्यातील सत्ताधारी व विरोधी पक्ष कायम नुसते जनतेचे दुर्दैव व राजकारण सुरू असून याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासन यांचेवर राहील असे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर यांनी दिलेल्या पत्रकात कळविले आहे.