पाटील समाज पंच मंडळाची कार्यकारिणी जाहीर…

44

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.3डिसेंबर):– येथील मराठे गल्ली परिसरातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाना सजन पाटील यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठे गल्ली परिसरातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. समाजाच्या मिटिंगमध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत व सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.

यामध्ये अनुभवी दिग्गज व तरुणांचा सहभाग असा मेळ साधण्यात आला. या नवीन कार्यकारिणी ची मुदत ५ वर्ष असेल. यामध्ये नाना सजन पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

त्याचप्रमाणे दिपक जयराम पाटील (उपाध्यक्ष), तुकाराम महादू पाटील (सचिव), राहुल राजेंद्र पाटील (खजिनदार), त्रंबक पांडुरंग पाटील (सहसचिव), नाना शंकर पाटील (स्टोअर किपर) तसेच संचालक पदी हिलाल भगवान पाटील, आबा सुकलाल पाटील, रामेश्वर संतोष पाटील, देवेंद्र सुभाष पाटील, लक्ष्मण उत्तम पाटील, बापू महादू पाटील, भागवत चिंधू पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल समाज बांधवांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच आपल्या हातून उतम समाजकार्य घडो, अशी अपेक्षा देखील वर्तवली