मांडवा येथे श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

52

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3डिसेंबर):- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे श्री .समर्थ नागोजी महाराज देवस्थान परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरांच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आला.

गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण मंदिराच्या स्थापनेसाठी मांडवा येथे श्रीकृष्ण मित्र मंडळाची स्थापना करून प्रत्येकी सदस्य शंभर रुपये प्रत्येकी महिन्याला जमा करून आज रोजी एक लाख पस्तीस हजार रुपये जमा झाले आहे .व तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यातून भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिराचे भूमिपूजन पोलीस पाटील दत्तराव पुलाते, उपसरपंच विजय राठोड, जोशी महाराज,महादेव डोळस,अनिल पुलाते, पिंटू महाराज, श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश पुलाते, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गोधाजी सुपले, रामाजी टेकाळे, अरुण मंदाडे,आनंदराव चिरमाडे,पंडित पुलाते, भावराव आबाळे,हरिभाऊ धाड, ग्रा.पं.सदस्या शालिनीताई धाड, ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, रोहन पारध, गोविंद काजळे, गोविंद पुलाते, व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी , सदस्य , श्री समर्थ नागोजी महाराज देवस्थानाचे भजनी मंडळ,महिला , व गावकरी मंडळी उपस्थित होते.