विठ्ठलवाडा शाळेंनी बांधला वनराई बंधारा

97

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)

विठ्ठलवाडा(दि.6डिसेंबर):- जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांच्या संकल्पनेतून साकारलेली वनराई बंधाऱ्यांची संकल्पना आज जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली.विठ्ठलवाडा गावाच्या उत्तरेला असलेल्या मोठया नाल्यावर 25 फूट लांब वनराई बंधारा बांधण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी 1 किलोमीटर अंतरावरुन सिमेंट बॅग मध्ये रेती भरून वनराई बंधारा पूर्ण केला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आवडे सर,विषय शिक्षक गौतम उराडे सर,विठ्ठल गोंडे सर तसेच सहाय्यक शिक्षक मोरे सर,उमरे सर,कोकुलवर सर,गेडाम सर,चौधरी मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,तरुण युवक मंडळी व वर्ग 4 ते 7 चे 100 विद्यार्थी उपस्थित होते.अशा प्रकारे सर्वांच्या मदतीने 25 फूट लांब वनराई बंधारा बांधण्यात आला. याचा फायदा शेतकरी बांधवाना व जनावरांना होईल.भविष्यात जलसाठा वाढण्यास मदत होईल.अशी माहिती वनराई बांधल्या नंतर विद्यार्थ्यांना देण्यात आली