डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न

80

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6डिसेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. देवेश कांबळे यांनी भूषविले होते कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर विजय मेश्राम, देसाईगंज लाभले होते. मान. आशिष बोरकर ए.पी.आय. पोलिस स्टेशन, ब्रम्हपुरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध अणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून, दीप प्रज्वलित करून महामानवाला अभिवादन करण्यात आले आणि सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विधाने उद्धृत करून त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक इंजिनीयर विजय मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम,समाजप्रेम, देशप्रेम यावर विस्तारपूर्वक विवेचन करून सद्यस्थितीवर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान.आशिष बोरकर, ए.पी.आय. पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी आपल्या स्वानुभवातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व्यक्ती आणि समाज परिवर्तनास प्रेरक आहे असे भाष्य करून बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता त्यांच्या विचारांना डोक्यात घेण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान अवताडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी मानले.