वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

    37

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.6डिसेंबर):-येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला येवला शहर व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मुक्तार भाई तांबोळी व दीपक गरुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव व राम कोळगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

    तसेच सामूहिक बुद्ध वंदना , भीम स्तुती व पूजा पाठ करून मुक्तिभुमी येथील सभागृह येथेही अभिवादन करण्यात आले यावेळी covid 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने व ओमिओक्रोन आजाराचे साथीचे रुग्ण वाढत असल्याने डॉ बाबासाहेबआंबेडकर अनुयायांनी स्मारक विहार अशा ठिकाणी गर्दी न करता घरूनच अभिवादन करण्याचे आव्हान यावेळी वंचित च्या महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखा साबळे यांनी यावेळी जनतेला केले यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे, जिल्हा संघटक शबनम शेख, पौर्णिमा गरुड, दिपक गरुड, भाऊसाहेब जाधव, राम कोळगे, मूक्तारभाई तांबोळी, शंकर जाधव सर, तुळशीराम जगताप, दिवाकर वाघ, शशिकांत जगताप, विलास आहिरे, रवी सोनवणे,अमोल पगारे, विनायक वाहुळ, जगन चव्हाण प्रभाकर गरुड, सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते