नाशिकचा जगदीश झळकला इंडियन आयडल मराठी मध्ये

  37

  ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

  नाशिक(दि.6डिसेंबर):- निफाड तालुक्यातील विंचुर येथिल माणूस मेहनत, जिद्द व कला यांच्या जोरावर काय प्रगती करू शकतो, हे एका विंचूर सारख्या छोट्याशा गावांमधून आलेल्या जगदीश चव्हाण यांनी आज महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. जगदीश चव्हाण हा अतिशय गरीब घरातला एक होतकरू गायक आज इंडियन आयडॉल मराठी या सोनी मराठी चैनल वर नव्याने सुरू झालेल्या शो मध्ये सहभागी झाला.

  त्याचे अंतिम १४ स्पर्धकांना मध्ये निवड झालेली आहे.
  जगदीश चव्हाण हा सध्या विंचुर ता. निफाड जि.नाशिक येथे राहत असून, तो मूळ बेलखेडा तांडा ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर असून, आई घरकाम करते. त्याला दोन बंधू असून, सर्वांमध्ये लहान असणारा जगदीश हा, पंडित शंकररावजी वैरागकर सर यांच्याकडे,लहानपणापासून गाण्याचे शिक्षण घेत होता. मात्र आता पुन्हा नव्याने तो मराठीत पहिल्यांदाच येत असलेल्या, इंडियन आयडॉल मराठी या शोमध्ये सहभागी झाला असून, पहिल्याच दिवशी त्यांनी परीक्षक संगीतकार अजय-अतुल तसेच, बेला शेंडे यांची मने जिंकली आहेत. आता या मध्ये तो आपली वाटचाल दमदार रीतीने पुढे करील, असा ग्रामीण भागातील सर्वच जनतेचा विश्वास आहे.

  जगदीश हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा व्यक्ती असून, कोपरगाव येथील आत्मा मलिक आश्रमात तो राहात असतो. तिथेच तो विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतो असतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, आपल्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी त्यांनी हा पेशा निवडला असून, आतापर्यंत अतिशय कष्टाने तो इथपर्यंत आलेला आहे. आता या शोमध्ये सहभागी व्हावे, अशी सर्व नाशिक जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्हा यातील मान्यवर पाहुण्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. जगदीशच्या सुरांची ताकद आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर दर सोमवार व मंगळवार रात्री नऊ वाजता बघायला मिळणार असून, सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन दैनिक अक्षराजच्या माध्यमातून करण्यात येत आहे.