चारगाव बू येथे अंधश्रध्दा निर्मुलन तथा महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न ….

41

✒️शेगाव बू प्रतिनिधी(मनोज गाठले)

शेगाव(दि.7डिसेंबर):-स्थानीक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे आज चारगाव बू चे आराध्य दैवत श्री संत नानाजी महाराज तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संयुक्त रित्या पुण्यतिथी महोत्सव दरम्यान सहा डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस स्टेशन शेगाव बू तसेच लक्ष्मी नारायण देवस्थान काला कमिटी , चारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती चंद्रपूर जिल्हा सहसचिव श्री अनिल लोनबले , श्री सारंग भिमटे चिमूर , श्री किशोरशाह आत्राम , हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . तर आज समाजात सुरू असलेल्या वाईट रूढी परंपरा , अंधश्रध्दा , बुवा बाजी , भूत प्रेत , जादू तोना , या गंभीर प्रकरणात अडकलेल्या लोकांना विशेष मार्गदर्शन करण्या त आले .

तर अश्या वाईट वृत्ती करून यात गरीब जनतेची दिशाभूल करून त्यांची आर्थिक फसवणूक करीत असेल तसेच गुप्तधन प्राप्त करून देतो असे सांगून त्यावर नरबळी , वाईट कृत्य करणे हे कायद्याने गुन्ह्यात प्राप्त असून त्यांच्यावर कठोर शिक्षा सह कारवाई देखील होते . व अश्या लोकांची गुप्त माहिती पोलिसांना दिली तर त्यांना अटक करून माहिती देणाऱ्या व्यक्तींना विशेष बक्षीस सुधा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तर यात अनेक बुवा बाजी करणारे ठक बाबा लोकांना कसे ठगवतात यावर जादूचे प्रयोग काही प्रात्यक्षिक करून लोकांना जागृत करण्याचे कार्य अंधश्रद्ध निर्मुलन समिती चे कार्यकर्ते यांनी केले .

तर महिला सबलीकरण – सक्षमीकरण यावर शेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम तसेच श्री प्रवीण जाधव यांनी या विषयावर उपस्थित महिला व विद्यार्थ्यांनी ना समाजात सुरू असलेल्या महिलांची पिळवणूक , अल्पवयीन मुली वर अत्याचार , अश्या अनेक ज्वलंत समस्यांवर विशेष मार्गदर्शन केले .या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून श्री योगेश वायदूडे सरपंच , श्री छगन आडकिने त. मू. अ. श्री राजू थुल पो पा. श्री मधुकर भलमे , अविनाश डाहुले , व इतर मान्यवर हजर होते. कार्यक्रमाचे संचालन श्री विठ्ठल तुरानकर यांनी केले तर आभार श्री योगेश वायदुडे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मनोज गाठले , यांनी मोलाचे सहकार्य केले.