डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनीचे अयोजन

    46

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी (दि.7डिसेंबर):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. या ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर विजय मेश्राम, देसाईगंज यांच्या हस्ते करण्यात आले.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे प्रामुख्याने उपस्थित होत्या. ही ग्रंथ प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ. उमेश हरडे अणि ग्रंथालय विभागातील कर्मचारी हर्षाली शिंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले.महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक तथा कर्मचारी यांनी या प्रदर्शनीचा लाभ घेतला.