डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने केले अभिवादन

51

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.6डिसेंबर):- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने येथील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

राजरत्न वाहुळ,विकास शिंगाड़े,तौसीफ अंसारी,जीवन दौन्डे आदी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.वाचनालय व अभ्यासिकेचे अध्यक्ष सुरेश खळे,अभिमन्यू शिरसाठ,बाळा खळे,वसतिगृह व्यवस्थापक खैरनार सर आदी या वेळी उपस्थित होते समन्वयक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला