गेवराईच्या बसस्थानकात प्रवासी घेऊन जाणार्‍या वाहनांकडून घेतले जातात दोनशे रुपये

36

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7डिसेंबर):-गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने बसस्थानकातून एकही बस बाहेर पडत नसल्याने खासगी वाहनांना आरटीओच्या उपस्थितीत प्रवासी घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली.मात्र गेवराईच्या बसस्थानकात या वाहनांकडून प्रत्येक फेरीसाठी दोनशे रुपये घेतले जातात. दोन खासगी इसम ही वसुली करत असून हा सर्व प्रकार आरटीओच्या समक्ष होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते वसुलीबाज तरुण नेमके कोणी नेमले? आरटीओ की गेवराई पोलिसांनी ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

एसटी बंद असल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना प्रवासासाठी वाहन उपलब्ध व्हावे म्हणून खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक बसस्थानकातून खासगी वाहने प्रवाशांना घेऊन जातात.
विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणच्या बसस्थानकावर आरटीओचे कर्मचारी आणि पोलीस उपस्थित आहेत. गेवराईच्या बसस्थानकात मात्र प्रवाश्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांकडून वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.प्रत्येक वाहनाच्या फेरीला दोनशे रुपयांचा भाव ठरला असून दोन खासगी इसम ही वसुली करत आहेत.