ख्रिस्ताणंद चौकातील अनियंत्रित वाहतुकीवर नियंत्रण अत्यावशक

32

🔸शहरातील अपघातप्रवण स्थळाला “ट्राफिक सिग्नल” लाभणार का ?

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8डिसेंबर) :-ख्रिस्ताणंद चौक हे शहरातील मध्यवर्ती व प्रवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठिकाणं इथूनच चंद्रपूर जिल्हा,नागपूर जिल्हा ,गडचिरोली जिल्हा व ब्रम्हपुरीच्या मुख्य बाजारपेठेत जावे लागते, या चौकमध्येच शहरातील नामांकित ख्रिस्ताणंद हॉस्पिटल चे मुख्य प्रवेश दार व ख्रिस्ताणंद चौक सतत गजबजले असते त्यामुळं इथे ट्राफिक पोलीस पहायला मिळतात मात्र सदर चौकात वाहतुकीची नेहमी वाताहत शहरवासियांना अनुभवायला मिळत आहे त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने अशा अपघातप्रवण स्थळावर काळजीपूर्वक लक्ष घालून होणारी वाहतुकीची कोंडी सोडवावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे

ख्रिस्ताणंद हॉस्पिटल चौकात ऐन मुख्य भागात रस्त्याच्या दोन्ही भागात असलेला अतिक्रमण, सतत दोन- तीन प्रायव्हेट ट्रॅव्हल्स व तीन चाकी आटो प्रवासी शोधतांना घिरट्या घालत फिरत असल्याने शंभर फुटा पलीकडे असलेला रोड अगदी पाच ते दहा फुटाचा होत असल्याने शहरातील नागरिकांना तिथून मार्ग काढणे तारेवरची कसरत ठरत आहे तर बऱ्याच प्रसंगी किरकोळ अपघाताला तर कधी जीवास मुकावे लागत आहे.

वयोवृद्ध, महिला व बालकांना रोड क्रॉस करतांना होत असलेला जीविताचा धोका व दिवसागणिक वाढत असलेली वाहतूक बघता पोलीस प्रशासनाने अशा धोक्याच्या स्थळावर कुठलीही हयगय न करता इतके गांभीर्यपूर्ण विषय काळजीपूर्वक हाताळावे तर राजकीय पक्षाने नागरिकांच्या जीविताशी संबंधित अश्या मुद्यावर दुर्लक्ष न करता प्रशासना कडून ख्रिस्ताणंद चौकात “ट्राफिक सिग्नल” ची सुविधा उपलब्ध करून द्यावी व प्रशासनाने त्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहे.