चाईल्ड उन्नती फाउंडेशनच्या वतीने टाकेवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

    129

    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

    म्हसवड(दि.8डिसेंबर):-माण तालुक्यातील टाकेवाडी येथे माध्यमिक विद्यालयात उन्नती फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल.

    यावेळी सोसायटीचे चेअरमन दिलीप दडस, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नदाफ सर, सरपंच निलेश दडस, जालिंदर दडस माजी सरपंच रामदास दडस, सोसायटी चेअरमन वसंत दडस, माजी उपसरपंच किरण घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सस्ते व गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.