भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षणाधिकारी कार्यालयात सहविचार सभेचे आयोजन

    40

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.10डिसेंबर):-परभणी जिल्हा भाजपा शिक्षक आघाडी यांच्या कार्यकारिणीत दि : 5 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या विषयानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्र्न निकाली काढण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांच्या कक्षात लोकप्रतिनिधी आ.मेघना दीदी बोर्डीकर ,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा) डॉ.सुभाष कदम, बाबासाहेब जामगे व भाजपा मराठवाडा विभागीय संयोजक प्रा.नितीन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी सहविचार सभा आयोजित केली आहे.

    परभणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कळविण्यात येते की,शिक्षकांचे काही वैयक्तिक प्रश्ना संबंधित कार्यालयात काही कामे प्रलंबित असतील तर शिक्षकांनी जिल्हा संयोजक अरविंद वडकर , महानगर संयोजक लखन सिंग जाधव, लक्ष्मीकांत क्षीरसागर, जिल्हा सहसंयोजक राजपाल दुर्गे,वसंत तळेकर,दिनकर ठोंबरे,गोपाळ मंत्री व भाजपा शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात 3 प्रतीत दि 17 डिसेंबर 2021 पर्यंत द्यावेत व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहविचार सभेसाठी उपस्थित राहावे असे भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.