डोंगरगाव येथे आजादी का अमूत महोत्सव साजरा

  31

  ✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

  उमरखेड(दि.10डिसेंबर) : -तालुका परिसरातील डोंगरगाव येथील शांतिदूत महिला ग्रामसंघाच्या वतीने भारत की आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  उमरखेड पंचायत समिती अंतर्गत उमेदच्या माध्यमातून स्थापन झालेल्या शांतिदूत महिला ग्रामसंघ आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती उमरखेड यांच्या संयुक्त विघमानाने भारत की आजादी का अमुत मोहत्सव मोठ्या उत्साहात व विविध योजनांची माहिती देऊन साजरा करण्यात आला.

  दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना या योजने अंतर्गत ज्यांचे वय वर्षे 18 ते 35 असेल अशा पात्र लाभार्थ्यांना कमीत कमी 3 महिने प्रशिक्षण व जाँब प्लेसमेंट आणि शासनमान्य सर्टिफिकेट मोफत.

  देउन व्यवसाय उभारणीसाठी मदत केली जाणार आहे.
  या मानवविकास मिशन महिला समुह ग्रामसंघ उत्पादक समुह वनधन केंद्र हि योजना देउ शकतात.

  यात अनु जाती , जमातीसाठी 90% व इतर प्रवर्गासाठी 75% अनुदान दिले जाते यात प्राधान्याने नवीन्यपुर्ण उद्योग
  व व्यवसायांना प्राधान्य दिले जाते.

  प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य विकास योजना या योजनेच्या माध्यमातून नविन व क्रियाशील पात्र वैयक्तिक आणि समुहांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून शाश्वत उपजिविका वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून गावाच्या सरपंच ममता विनोद शिंदे सामाजिक कार्यकर्ते विष्णू कवाने व बँक सखी म्हणून संजना पाटील, अंगणवाडी सेविका कविता संतोष कदम, डोंगरगाव ICRP सीमा राहुल काळबांडे, पशु सखी वालतूर, ICRP सुभागी निरंजन नपते बोरगाव, वालतूर, चिखली व उमेद गटाचे कर्मचारी म्हणून प्रभाग समन्वयक सत्यम साळवे व गावातील महिला व नागरिक हजर होते.