कमळवेल्ली येथे टेनिस बाॅल (सर्कल) क्रिकेटचे खुले सामने संपन्न

23

🔹परिसरातील प्रसिद्ध अनिल मोहजे यांच्या नेतृत्वातील संघाने प्रथम पुरस्कार पटकाविला

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.11डिसेंबर):-आजच्या युगात लाखो युवकांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट होय. याच खेळाप्रती आजच्या युवकांमध्ये असलेल्या अतिउत्सुकता व दडलेल्या प्रतिभेला वाव देण्याच्या नि ते लोकांपुढे प्रकट करण्याच्या अनुषंगाने नवयुवक क्रिकेट क्लब कमळवेल्लीच्या वतीने टेनिस बाॅल (सर्कल) क्रिकेटचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्याचा शुभारंभ दि.28 नोव्हेंबरला करण्यात आला होता. तर हे सामने चौदा दिवस चालले. आज दि.11 डिसेंबर रोजी या सामन्याचा शेवट होता. यात ब-याच गावच्या संघाने सहभाग नोंदविला. यात प्रामुख्याने चंद्रपूर, वरोरा सारख्या ठिकाणच्या संघाने प्रवेश घेतला होता. परंतु ते अंतिम सामन्यापर्यंत मजल मारू शकले नाही. या सामन्यांचा आनंद गावकरी व परिसरातील अनेक गावातील जनतेंनी घेतला.

यात परिसरातील प्रसिध्द व लोकप्रिय असलेली सतपल्ली येथील अनिल मोहजे यांच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम पुरस्कार प्राप्त केला, द्वितीय पुरस्कार आयोजक संघाने, तृतीय पुरस्कार पांढरकवडा संघाने तर चतुर्थ पुरस्कार सतपल्ली येथील दुस-या संघाने प्राप्त केला. या कार्यक्रमाच्या शुभारंभ व समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वामनराव येलचलवार, प्रविणभाऊ चुक्कलवार,भगवानराव चुक्कलवार, मोहनराव चुक्कलवार, लक्ष्मणराव चुक्कलवार,वामनराव हलवेले, रामन्नाजी चुक्कलवार, जीवनराव चुक्कलवार, विठ्ठलराव ठाकरे, भुमारेड्डीजी बोनगिरवार, भाऊरावजी ठाकरे व इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. या सामन्याच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळाचे अध्यक्ष साईकिरण बोनगिरवार, उपाध्यक्ष अमोल चुक्कलवार, सचिव श्रीनिवास कोम्मावार, सहसचिव गणेश नुगुरवार, कोषाध्यक्ष प्रफुल चुक्कलवार, क्रिडा प्रमुख अखिल गिज्जेवार, सैय्यद महम्मद व इतर सदस्यगण यांनी धावपळ करून अथक परिश्रम घेतले. अशाप्रकारे हे सामने अतिशय शांततेने व मनोरंजनात्मक वातावरणात संपन्न झाले.