राजेंद्र बंसोड यांना रयतेचा कैवारी परिवारातर्फे राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित

30

✒️गोंदिया(पुरोगामी न्युज नेटवर्क)

गोंदिया(दि.16डिसेंबर):- डिजिटल दैनिक “रयतेचा कैवारी” आयोजित पहिला राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार सोहळा नाशिक च्या के.टी. एच.एम.महाविद्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला.या दैनिकाचे मुख्य संपादक मा.शाहू संभाजी भारती सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला सोहळा नियोजन बद्ध तेवढाच नेत्रदीपक होता.

यावेळी शिक्षक आमदार मा. सुधीर तांबे, आशिया खंडातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक बी. बी. गुंजाळ, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे, जावळे साहेब, प्राचार्य भगवानसिंग राजपूत, ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, विलास काळे, केंद्रप्रमुख नवनाथ जाधव, राजकवी ख. र. माळवे ( खरमा ) रयतेचा कैवारीचे संपादक शाहू भारती, उपसंपादक संजय येशी, सर्व संपादक मंडळ, विभाग प्रमुख यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हयांचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, पुरस्कारार्थी आदि मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या 36 जिल्ह्यातील 36 शिक्षकांना शाल, व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत असणाऱ्या या राजेंद्र धरमदास बनसोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा यांना सन्मानित करण्यात आले. हा सन्मान नक्कीच ऊर्जा देणारा आहे.नव्या युगाचा उदयोन्मुख शिक्षण प्रवाही कार्यकर्ता म्हणून हे व्रत कायम पुढे न्यायचं आहे त्यासाठी असे पुरस्कार नक्कीच अजून जोमाने कार्य करण्याची उर्मी देऊन जातात.तसेच तळागाळातील अज्ञात शैक्षणिक सारस्वतांना व्यक्त होण्याचं व संधी उपलब्ध करून देणारा मंच म्हणून रयतेच्या कैवारीने मागील दोन वर्षांपासून हे कार्य करीत आहे.

सातत्याने आपल्या कार्याला नवी दिशा आणि शिक्षण क्षेत्रासाठी असणारा हा नंदादीप तेवत राहो यासाठी त्यांचे जिल्हा परिषद शाळा निंबा चे मुख्याध्यापक आर.एच.नंदेश्वर, तथा शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. माधव शिवणकर, शिक्षक पालक समिती निंबा,रयतेचा कैवारी डिजिटल दैनिक चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी जयश्री सिरसाटे,किशोर बन्सोड,जैपाल ठाकूर ,सुंदरसिंग साबळे,सिंधू मोटघरे तथा तालुका प्रतिनिधी विनोदकुमार माने, हुमेन्द्र चांदेवार ,श्रीकृष्ण कहालकर सचीन धोपेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ..