हरडफ येथे भव्यदिव्य असे बुद्ध विहाराचे स्वप्न पूर्ण होणार बुद्ध विहार बांधकाम कमिटीची घोषणा; दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज

30

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)

हदगांव(दि.19डिसेंबर):- तालुक्यातील हरडफ येथे
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, लहान मुलांमध्ये धम्म संस्कार वाढावे व पुढील आयुष्य तो एक आदर्श व्यक्ती म्हणून जगवा या उद्देशाने मौजे हरडफ येथे भव्यदिव्य असे बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प गावातील लोकांनी केला आहे. त्यासाठी उल्लेखनीय कामगिरी गावातील कर्मचारी बांधव करीत आहेत त्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन विहारासाठी धम्मदान जमा करून कमिटीच्या स्वाधीन करीत आहेत त्यामुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे

गेली ४५ वर्षांपासून हरडफ येथे धम्म परिषद धम्म मेळावा घेतला जातो. तालुक्यात हरडफ हे गाव आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू असल्याचे मानल्या जाते.गावात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.
बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे दोन पूर्णाकृती असे पुतळे आहेत परंतु गावात बौद्ध बिहार नसल्याने विहाराची कमतरता होती तीच उणीव भरून काढण्यासाठी गावातील तरुण मंडळी, महिला मंडळ, कर्मचारी वर्ग व अनेक दानशूर मंडळी मदतीचा एक हात पुढे करीत असल्याने गावात भव्यदिव्य असे बुद्ध विहार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.आतापर्यंत बौद्ध विहार समितीने दोन लाख रुपये जमा केले आहेत. त्याला कर्मचारी वर्ग चांगला प्रतिसाद देत आहे.

बौद्ध विहार समितीने पन्नास लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामध्ये दोन मजली बुद्ध विहार पुस्तकाचे वाचनालय समोर गार्डन आणि विध्याथ्र्यांना राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे.सध्या एक कर्मचारी बांधव त्यांच्या ग्रुप मधील दहा कर्मचाऱ्यांचे दान कमिटीला देत आहेत यांना पण चांगला प्रतिसाद मिळत आहे गावातील तरुण वर्ग गावातील पट्टी जमा करीत आहेत. मजुरांना चार हजार रुपये, शेकऱ्यांना सहा हजार रुपये आणि कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अशी पट्टी अनिवार्य केली आहे. सर्वजण मेहनत घेऊन सहकार्य करत असल्याने लवकरच हरडफ येथे भव्यदिव्य असे बुद्ध विहार होणार आहे बौद्ध विहार बांधण्यासाठी प्रत्येकानी दान देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व विहार बाधण्यासाठी खारीचा वाटा उचललावा असे आवाहन बौद्ध विहार बांधकाम समितीने महिला मंडळ व तसेच कर्मचारी मंडळीतून करण्यात आले आहे.