🔸कोल्हापूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक विजयकुमार भोसले यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदाकरिता कांग्रेस पक्ष कडून शिफारस करण्याची मागणी वजा विनंती पक्षाचे वरिष्ठांना केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सादर केलेल्या पत्रात विजयकुमार भोसले यांनी आजपर्यंत कांग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचे सविस्तर वर्णन केले आहे
सुशिक्षित कुटुंबातील विजयकुमार भोसले हे गेल्या 23 वर्षांपासून पक्षात समर्पित भावनेतून काम करीत आहेत, पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कामाला प्रारंभ करून आज राज्य
समन्वयक पदावर कार्यरत आहेत. सन 1998 पासून हातकणंगले तालुका सेवादल तालुका खजिनदार, तालुका कार्याध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस पदावर काम केले. सन 2014 पासून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य कमेटी मध्ये सदस्य पदावर काम सुरू केले तर सध्या राज्य समन्वयक पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणे सुरू आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित त्यांचे वडिलांचा सामाजिक वारसा जोपासण्यासाठी विजयकुमार भोसले यांनी विविध सामाजिक उपक्रम आपल्या जिल्ह्यात राबविले, त्यांच्या कार्याचा उपयोग व्यापक स्वरूपात व्हावा म्हणून त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यामुळे भोसले यांनी पक्षाच्या वरिष्ठांना पत्र दिले आहे.
कांग्रेस पक्ष व विविध सामाजिक संस्थाचे माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, युवा विकास व अन्य रचनात्मक कामात सहभाग राहत असल्याने विजयकुमार भोसले यांना विविध संस्थानी सन्मानित केले आहे.
सामाजिक उपक्रम व पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदाकरिता कांग्रेस पक्षाचे वरिष्ठांनी शिफारस करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED