प्राचीन शनी मंदिर ते प्राचीन दक्षिणमुखी गणेश मंदिर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट कामाला गती

29

🔸माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी(दि.20डिसेंबर);-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सुचनेनूसार तसेच नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळीतील जून्या गाव भागातील महत्वपूर्ण असणाऱ्या भोईगल्ली येथील प्राचीन शनी मंदिर ते प्राचीन दक्षिणमुखी गणेश मंदिर या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट कामाला शनिवारी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी बाजीराव भैय्या धर्माधिकारी म्हणाले की, वैद्यनाथ मंदिर परिसरातील सदर रस्ता हा अतिशय महत्त्वपूर्ण असून एकंदरीत जून्या गाव भागाकरिता दर्शन मार्ग आहे तसेच अंत्यविधीसाठीही हाच रस्ता पारंपारिकरीत्या मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.भूयारी गटार योजनेच्या विकास कामासाठी हा रस्ता खोदून “सिव्हरेज लाईन” व “म्यान होल व प्रॉपर्टी चेंबर” तयार करण्यात आली होती. सदर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरणचे काम आज प्रत्यक्ष सुरु झाल्याचा आनंद वाटतो आहे.

रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, नगरसेवक अनिल आष्टेकर, माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले, जे.के.कन्स्ट्रक्शन चे जाफर खान बाशीत भाई,लालाखान पठाण, खदिर भाई,अरुण महाराज टिंबे, पत्रकार अनंत उर्फ पप्पु कुलकर्णी, सुरेशगुरु राजूरकर,शेरु भाई,इरफान टेलर,अय्युब खान पठाण, गजानन तांदळे, वैजनाथ इगवे आदींची उपस्थिती होती.