निर्दयी बापाने चार वर्षाच्या पोटच्या मुलाला ज्यूस मध्ये विष पाजून जिवानिशी मारण्याचा केला प्रयत्न..!

80

🔺घरच्याना माहिती होताच स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा केला सोंग…

🔺हा बाप होय की हैवान… विष पाजून मारण्याचे कारण तरी काय??

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.21डिसेंबर):-शहरात काळीज फाटण्यासारखं, माणुसकीला काळीमा फासणारी घटना दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी घडली, चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील मौजा पारगाव येथील रहिवाशी निर्दयी बाप म्हणजेच प्रशांत जनार्धन चिलमुलवार यांची पत्नी स्टॉप नर्स असल्याने वास्तव्यास गडचिरोली येथे राहत होते,सदर घटना १८ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यानची असून,पीडित मुलगा मरणाच्या दारात असून चंद्रपूर येथील खाजगी हॉस्पिटल ला उपचार घेत आहे,व ज्याला बाप म्हणायला लाज वाटते तो पण निर्दयी बाप सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार घेत आहे.सविस्तर वृत्त असे की गडचिरोली शहरातील गोकुल नगर या ठिकाणी प्रशांत नमक व्यक्तीने आपल्याच पोटच्या एकुलत्या एक चार वर्षाच्या मुलाला विष पाजून जिवे मारण्याचे प्रयत्न करणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी घडली आहे.

घरात कितीही वादविवाद झाले तरी वडीलाने निर्दयी, निष्ठुर पने आपल्या एकुलत्या एक मुलाला विष देऊन मारण्याचे प्रयत्न केल्यामुळे गडचिरोली शहर पार हादरून गेलेले आहे.या घटनेची थोडी हकीकत वाचकांसमोर येणे गरजेचे असून एखादा मनुष्य आपल्या मनात संशय ठेवून एक मोठा घातकी निर्णय कसा घेतो याचा विचार करण्याची गरज आहे.आपल्याच पोटच्या चार वर्षीय मुलाला विष पाजणाऱ्या या निर्दय निष्टुर व्यक्तीचे नाव प्रशांत जनार्दन चिलमुलवार वय ३५ वर्ष आहे.याचे २८ मार्च २०१६रोजी गडचिरोली सामान्य रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मधुकर लाटीलवार कर्मचा-यांची मोठी मुलगी बाल व महिला रुग्णालयात गडचिरोली येथे स्टॉप नर्स म्हणून कार्यरत जयमाला लाटीलवार, हीच्यासोबत प्रशांत याचे लग्न झाले होते.एक दीड वर्षाचा कालावधी झाल्यानंतर प्रशांत व जयमाला या दाम्पत्याला एक गोंडस मुलाच्या रुपात दिशांत नावाच्या पुत्र रत्नाची प्राप्ती झाली.अशा प्रकारे आपल्या सुखी आनंदी आयुष्य दोघेही सुखरूप घालवत होते.

जयमाला आणि प्रशांत यांचा सुखी संसाराचा गाडा सुरळीत सुरु असताना अचानक एक दिवस प्रशांत आपल्या प्रेमिके सोबत पळून जाउन तीन चार महिन्यापर्यंत आपल्या घराकडे दुर्लक्ष करीत मदमस्त होऊन प्रेमिकेसोबत वेळ घालवत होता.महिला रुग्णालयातील नौकरी करणारी मुलगी व लहान नातू यांची योग्य देखरेख व्हावी या करीता प्रशांत ला समज देऊन सासू, सासऱ्यानी,गडचिरोली येथे येऊन राहण्यास राजी केले होते.सासुर वाडीत येऊन राहणाऱ्या प्रशांत ने पुन्हा काहीतरी नवीन संशय मनात निर्माण करत, पत्नी व सासू सासरे यांचेशी वाद विवाद करू लागला होता.वारंवार मनात संशयाचे भूत सवार झाल्याने आपल्या पत्नीवर संशय घेणे पत्नीसोबत झगडा भांडण करत राहण्याची सवय काही प्रशांत सोडायला तयार नव्हता, म्हणून जयमाला ने कौटुंबिक समुपदेशक केंद्राची मदत घेऊन,आपल्या पतीला समजावत आपण वेगळे घर घेऊन राहू असे सांगून गोकुळ नगर येथे एका किरायाच्या घरात राहण्यास गेले.

काही दिवस सुरळीत घर संसार सुरू असताना पुन्हा २०१९/२०२० मध्ये आपल्या पत्नी, व लहान मुलाला सोडून घरातून निघून जाण्याचे कृत्य पुन्हा केले.आपला नवरा वारंवार घर सोडून जातो, या कारणाने त्रस्त होऊन,तसेच रुग्णालयातील कामात अडथळा, व लहान बाळाकडे घरच्या लोकांची देखरेख व्हावी यासाठी आपल्या मुलाला घेऊन पुन्हा आई वडीलांच्या घरी राहण्यास गेलीली. आई वडीलांच्या घरी येऊन तीन महिन्याचा कालावधी होताच प्रशांत पुन्हा आपल्या सासुरवाडीत येऊन राहायला लागला.दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळी 8वाजेच्या सुमारास पत्नी जयमाला ला महिला रुग्णालयात कर्त्यव्याकरिता सोडून दिल्यानंतर ०९.३० च्या दरम्यान घरी येऊन मुलाला फिरवून आणतो असे आपल्या सासूला सांगून आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडला,परंतु वारंवार डोक्यात शिरलेला संशयाचा भूत हा प्रशांत ला सोडत नव्हता.
मुलाला फिरवण्यास नेतो म्हणून गेलेला प्रशांत उशिरा पर्यंत घरी न आल्याने, घरी असलेल्या सासूने प्रशांत च्या मोबाईल वर संपर्क करीत होते.अखेर एक वाजेच्या सुमारास प्रशांत आपल्या मुलाला विष देऊन सासूच्या दारातच सोडून न सांगता निघून गेला.

जयमाला ची आई ने आपल्या नातवाला जेवण देण्याचे प्रयत्न केले असता, नातवाने पोटात दुखत असल्याचे दिसून आले व अचानक बेशुध्द होऊन खाली कोसळला, लगेच नातवाची प्रकृती बिघडल्याने सासूने प्रशांतला संपर्क करून मुलाला उपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले.व शहरातील डॉ.चलाख,यांचे कडे घेऊन गेले असता,डॉक्टरांच्या सल्याने मुलाची सोनुग्राफी काढण्यास जातांना,
महिला रुग्णालयात व्यस्त असताना मुलाची प्रकृती बिघडल्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती घेऊन जयमाला सोनोग्राफी सेंटर येथे पोहचली.गडबडीत सोनोग्राफी सेंटर कडे येत असताना आपला पर्स महिला रुग्णालयात विसरल्याचे लक्षात आले असता प्रशांत ला पर्स आणावयास सांगितले,पर्स आणावयास गेलेला प्रशांत आपला मोबाईल बंद करून फरार झाला होता.मुलाची प्रकृती गंभीर होत असल्याने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी एम.आर. आय. रिपोर्ट काढण्यास चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितले.दुपारी अडीच वाजता आपल्या भावाच्या मदतीने जयमाला आपल्या मुलाला उपचार करण्याकरिता चंद्रपूर जाण्यासाठी निघाली असता,वाटेतच मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्याने प्रशांत ला संपर्क करण्याचे प्रयत्न केले असता प्रशांत चे मोबाईल बंदच असल्याचे आढळून आले होते.

कशीबशी जयमाला चंद्रपूर येथील जटपूरा गेट परिसरातील डॉ. मावानी यांचे कडे दाखल केले.मुलाची प्रकृती गंभीर स्वरूपाची दिसून आल्याने डॉ. मावानी यांनी मुलावर विष प्रयोग झालेले आहे असे सांगून ताबडतोब उपचार सुरू केले होते.इकडे मोबाईल बंद करून पळालेल्या प्रशांत च्या मोबाईल वरून एका अनोळखी व्यक्तीने फोन करून प्रशांत आरमोरी रोड वर बेशुध्द पडून असल्याचे सांगितले.अशा संकटकाळी आपल्या मुलाचे उपचार करीत असलेल्या जयमालाने अनोळखी व्यक्तीला विनंती करून प्रशांत शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करा व मुलाला कोणते विष पाजले आहे असे विचारण्यास सांगितले,त्या अनोळख्या व्यक्तीने प्रशांतला शुध्दीवर आणून विचारले असता, प्रशांत ने आपल्या खिशातून शिंबुस नावाच्या कीटनाशक ची बॉटल दाखवून मुलाला ज्यूस मधून विष पाजले व स्वतः सुध्दा विष पेल्याचे कबूल केले होते.स्वतः च्या मुलाला विष देऊन आत्महत्या करणाऱ्या प्रशांतला पोलिसांच्या मदतीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यालासुद्धा पुढील उपचारासाठी चंद्रपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जयमालाची विचारपूस केली असता डॉ. मावानी यांचेकडे योग्य उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

पण विष प्रयोग करणाऱ्या या निर्दयी प्रशांत ची प्रकृती कशी आहे हे बातमी लीहेपर्यंत मिळालेली नाही, अस्या निर्दयी, निष्टुर, बाप प्रशांत ला कठोर कार्यवाही व्हावी अशी लाटीलवार परिवाराडून होत आहे.