नगर सेविका सीमा बुटके यांचे उपोषण स्थगित–चिमूर नगर परिषदने दिले ठोस आश्वासन

16

 

चिमूर(पुरोगामी संदेश न्यूज़ नेटवर्क)

चिमूर(दि:-19 जून) नगर परिषद च्या प्रभाग 6 मध्ये विकास कामे थंडबसत्यात ठेवून दुर्लक्षित करीत असल्याने नगरसेविका सीमा बुटके यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलेला असताना मुख्याधिकारी मंगेश खेवले यांनी चर्चा करून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले

चिमूर नगर परिषद अंतर्गत प्रभाग 6 मध्ये विविध समस्या असून त्यात देवराव पिंपळकर यांचे घरासमोरील मूळ नळाचे पाईप लाईन वरून जोड कनेक्शन टाकून नळ पाईप लाईन करण्याचे काम मंजूर असून सुद्धा काम थंडबसत्यात आहे .परमानंद सोरदे यांचे दुकानपासून बंदिस्त नाली बांधकाम सुध्दा बंद अवस्थेत आहे . बावनकर कृषी केंद्र ते वसंत बावनकर पर्यत चे पेवर ब्लॉक काम बंद असून तसेच जेसीपी ने गड्डा खोदून ठेवला अनेक विकास कामाची मोजमाप नेऊन सुद्धा गती देण्यात आली नाही. विद्युत पथदिवे नियमित लावण्यात येत नसून नाली उपसा केल्या जात नाही त्यामुळे जनतेला त्रास होत आहे. जुनी बँक ऑफ महाराष्ट्र ते गणपती मंदिर गल्लीतील स्वच्छता ठेवण्यात येत नाही अनेक ठिकाणी च्या बंदिस्त नाली काम आवश्यक असताना न.प. मोजमाप करून टाळाटाळ करीत आहे
चिमूर नगर परिषद प्रभाग 6 क्षेत्रातील जनतेवर अन्याय करीत असल्याने दि 17 जून 20 ला निवेदन देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा नगरसेविका सीमा बुटके यांनी दिलेला होता तेव्हा मुख्याधिकारी मंगेश खेवले यांनी न.प.कार्यालयात चर्चा करून येत्या आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यामुळे नगरसेविका सीमा बुटके यांनी आपले बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेत स्थिगिती दिली आहे. यावेळी जी.प. सदस्य गजानन बुटके सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, मयूर चिचुलकर,रमेश धारणे आधी उपस्थित होते.