एस अँड ए ट्रेंड्स इवेंट्स अँड प्रोडक्शनच्या फॅशन शो मध्ये करिश्मा माने, भावना गोयल, विकास गिरी व दुर्वा गांधी एलिगंंट आयकॉन महाराष्ट्र २०२१ चे मानकरी

28

🔹स्पर्धेत मॅक्स फॅशन व अनुराजिती ब्रँडचे आकर्षक पेहराव सादर

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.22डिसेंबर):- एस अँड ए ट्रेंड्स इवेंट्स अँड प्रोडक्शन च्या संचालिका व आयोजक अंजली जंगम यांच्या वतीने नुकतीच एलिगंंट अँड आयकॉन महाराष्ट्र २०२१ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मधे मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स असे विभाग होते. पारंपारिक आणि पाश्चिमात्य पेहेराव आणि प्रश्नमंजूषा या फेऱ्यांबरोबरच स्पर्धकांची चाल, आत्मविश्वास, स्वपरिचय या गुणांच्या आधारावर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. मिस्टर गटात विकास गिरी, अक्षय महाजन, अभिजीत खबाले, मिस गटात करिष्मा माने, प्रतिभा सांगळे, विशाखा कांबळे, मिसेस गटात भावना गोयल, कल्पना, रीतू अगरवाल,संगीता पाटील आणि किड्स गटात दुर्वा गांधी,मेघना अडसूळ ,गायत्री सावरे यांनी अनुक्रमे विजेता प्रथम उपविजेता आणि द्वितीय उपविजेते चा मान पटकावला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ग्लोबल वंडर आयकॉन महाराष्ट्र २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास मिस्टर वर्ल्ड रोहित खंडेलवाल उपस्थित होते. शोनी विर्दी, स्नेहल रहाणे, पूजा रेड्डी, डॉ. शोएब व डॉ रोहित शिंदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या दिमाखदार फॅशन शो चे आयोजन अंजली जंगम यांनी केले होते. कार्यक्रमासाठी ऑडिशन जुरी म्हणून लेखा अजित,पूजा रेड्डी आदींनी काम पाहिले.कार्यक्रमाचे संयोजन मोनिका जैन, दिप्ती शहा, दिपाली खामर आणि आकाश पांडे यांनी केले होते. सूत्रसंचालन रेवती यांनी केले.

या कार्यक्रमात ग्लोबल वंडर आयकॉन महाराष्ट्र २०२१ चे पुरस्कार्थीचा सन्मान डॉ. रश्मी वेद,आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट
आणि ट्रायकोलॉजिस्ट, डॉ अपेक्षा, संस्थापक आणि वैद्यकीय सल्लागार, फैसल सिद्दीकी,फॅशन मॉडेल, आशिष कुमार, सामाजिक कार्यकर्ता, स्नेहल रहाणे, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, पायल पवार,तरुण उद्योजक, सौरभ दसपुते, कोरिओग्राफर, भारती साहू, शिक्षणतज्ज्ञ, विवेक गोंड, व्यावसायिक छायाचित्रकार, पूजा मंडोरा आणि चिराग मंडोरा, व्यावसायिक फॅशन फोटोग्राफर, अ‍ॅन अँथनी, मॉडेलिंग आणि अभिनय, मेघा साळुंके, फॅशन मॉडेल यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाचे सहभागी प्रायोजक वन स्टेज, चंदुकाका सराफ, कलाकर पब्लिक, अनुराजिती, ग्लॅम गिल्ट, मॅक्स, क्लब महिंद्रा, स्किलेट्ज फाउंडेशन, पीएस फोटोग्राफी, एलएनजी, डिजिसेन्स, पुणेकर प्रतु, बी ब्लिस, सिटी गॉसिप, शिवधर्म, अनंत, सत्व, मुंबई ग्लोबल, द बिग फाईव्ह, आरएन टुडे, फॅशनवेव्ह हे होते.