आष्टीत भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बॉल(अंडरआर्म)क्रिकेट सामन्याचे आयोजन

41

🔹महालक्ष्मी क्रिकेट महोत्सव 2022

🔸मोठ्या बक्षीसाचा वर्षाव

🔹बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी कडून जास्तीत जास्त संघाने भाग घेण्याचे आवाहन

✒️श्री भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.24डिसेंबर):-तालुक्यातील आष्टी येथे बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टी यांच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बॉल (अंडर आर्म) क्रिकेट सोहळा दिनांक एक जानेवारी दोनहजार बाविस ला नविन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महसूल मंडळ बालाजी टाऊन आष्टी येथे करण्यात आले आहे .उद्घघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते होणार आहे.

व या स्पर्धेचे अध्यक्ष आष्टी ईलूर जिल्हा परिषद क्षेत्राचे च्या जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार या आहेत व विषेश अतिथी म्हणून डाॅ श्री प्रभाकरराव पंदिलवार माजी जिल्हा परिषद सदस्य. श्री गावडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी श्री विनयभाऊ येलमूले सामाजीक कार्यकर्ता श्री गणेश जंगले साहेब पोलीस उपनिरीक्षक आष्टी श्री गंगाधरजी पोटवार सामाजिक कार्यकर्ता श्री शंकर आकरेडीवार पंचायत समिती सदस्य श्री शंकरपाटील मारशेटीवार माजी पोलीस पाटील आष्टी श्रीमती कमलाबाई बामणवाडे माजी सरपंचा आष्टी हे मान्यवर उपस्थित राहणार असून या भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बॉल (अंडर आर्म) क्रिकेट सामन्यांचे प्रथम पुरस्कार सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांचे कडून 45001/- रूपये व द्वितीय पुरस्कार मा श्री अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली यांचे कडून 30001/- रूपये तृतीय पुरस्कार श्री राजूभाऊ पोटवार यांचे कडून 5000/- रूपये श्री नानाभाऊ पसपूलवार यांचे कडून 5000/- रूपये श्री महेंद्रबाबा दौलतराव आत्राम यांचे कडून 5000/-रूपये या प्रमाणे पुरस्कार ठेवण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावे असे आवाहन बालाजी टाऊन क्रिकेट क्लब आष्टीच्या वतीने करण्यात येत आहे