वहानगाव येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव

71

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25डिसेंबर):-श्री गुरुदेव सेवा मंडळ वहानगावच्या वतीने दिनांक २९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध कार्यक्रमानिशी वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दिनांक २९ डिसेंबरला सकाळी ५ वाजता ग्रामसफाई झाल्यानंतर हरिभाऊ दडमल यांचे हस्ते ग्रामगीता वाचन होणार आहे. त्यानंतर ह. भ. प. लीलाधर राऊत महाराजांचे सामुदायिक ध्यानपाठावर मार्गदर्शन होईल. सकाळी ७ वाजता हनुमान मूर्ती पूजनाकरीता अशोकराव खोंडे, शंकरराव सायसे, प्रभाकर दोडके, पांडुरंग आत्राम आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ह. भ. प. कुंभरे महाराजांचे सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन होईल. रात्रो ८.३० सत्यपाल महाराजांचे शिष्य ह. भ. प. अक्षय पाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कीर्तन होईल. दिनांक ३० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता ह. भ. प. घानोडे महाराजांचे सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन, रात्रो ८.३० वाजता ह. भ. प. गवते महाराज, ह. भ. प. गिरी महाराज यांचे कीर्तन होईल. दिनांक ३१ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता रामधून झाल्यानंतर दुपारी १२ वाजता गोपालकालाचे महत्वावर ह. भ. प. चरडे यांचे कीर्तन होईल.

महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ वहानगावचे अध्यक्ष विजय थुटे, सचिव प्रशांत मोहुर्ले, हरि दडमल, चंद्रभान खोंडे तसेच वहानगाव वासियांनी केले आहे.