चिमूर पोलिसांची अवैद्य दारू विक्रेत्यांवर धाड-5 लाख 77 हजार 400 रूपयाचा मुद्देमाल जप्त

18

 

      चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(19 जून):-
चिमूर पुलिसानी विविध ठिकाणी दारू विक्रेत्यांवर धाड़ टाकून 5 जनाना अटक केली तर चार आरोपी फरार आहेत. या कार्यवाहित 5,77,400 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला .
आज दि. 19 जून रोजी पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील चिमूर टाऊन परिसर, मासळ परिसर , नेरी परिसर , खडसंगी परिसरातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर चिमूर पोलिसांनी अचानकपणे धाड टाकल्याने चिमूर परिसरातील अवैद्य दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. आज एकूण 9 ठिकाणी कारवाई करून अवैद्य दारू विक्रेत्यांकडून मोहदारू , मोहा सडवा, देशी दारू असा एकूण 5,77,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.यात आरोपी नामे खटू शंकर नागपुरे रा. केसलापूर, नसीमा फिरोज शेख रा.चिमूर, मारोती बाबुराव गोसवाडे रा.मालेवाडा , श्यामराव बापूराव ननावरे रा. सावरगाव, विजय केवळराम शेंधरे रा सावरगाव यांना अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहे.
ही कारवाही ठानेदार स्वप्नील धुळे यांचे सोबत स.पो.नि. मंगेश मोहोड, पो.उप.नी. राजू गायकवाड, किरण मेश्राम, अलीम शेख, कांता रेजिवाड, पो.हवा.विलास सोनूले, विलास निमगडे , डोनू मोहूर्ले, घनश्याम मेहरकुरे,विजय वरघंटीवार, ना.पो.शी.किशोर बोढे, कैलास आलम, पो.शी. सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, रोशन तामशेतवार,विशाल वाढई, दगडू सरवदे, सुशील आठवले, विजय उपरे यांनी केली.