**योग करा , निरोगी राहा”***

15

“योग आहे आरोग्यासाठी क्रांती
नियमित योगामुळे
जीवनात येते सुख-शांती”.

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जीवनासाठी गुणकारी आहे. “Health is wealth.”
21 जून आता जागतिक योगा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव 2014मध्ये संयुक्त राष्ट्र पुढे ठेवला होता. 175 सदस्य देशांनी याला अनुमोदन दिलय. अशाप्रकारचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.21 जून 2015 पासून त्याची सुरुवात योग दिवस म्हणून झाली.
योगाचे जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहते.”sound body in a sound mind.”योगामुळे आरोग्याबाबत एक पवित्र ऊर्जा निर्माण होते. भारतीय धर्म संस्कृती मधील ” योग “संकल्पनेची मांडणी श्रीमद्भभगवदगीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्र द्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक ,बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे अध्यात्मिक उन्नती साधता येते.
“मन शांत करून
आत्म्याशी एकरूप
होण्याची क्रिया
म्हणजे योग.”
21 जून रोजी चा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे.म्हणून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन “म्हणून साजरा करण्यात येत आहे. केवळ आसन किंवा प्राणायाम यांनाच बऱ्याच वेळा आपण योग समजत असतो मात्र तसे नसून योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात.आरोग्य या शब्दाची जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्या,”शरीर, मने ,अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती”. अशी आहे. योगी सर्वांगिन आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे. योग आरोग्याची गुरुकिल्ली आहे. योगाचे उदगाते भगवान शंकर असून त्यांनी पहिल्यांदा पत्नी पार्वतीला योग सांगितल्याचे उल्लेख पुराणात आढळतात.
योग्य अशी निरंतर प्रक्रिया आहे की जी कायिक, वाचिक, आणि मानसिक पातळीवर माणसाला सर्वार्थाने निरोगी ठेवते. जवळपास पाच हजार वर्षाहून अधिक मोठी परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी राहण्यासाठी योग हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अंग बनायला हवे.
आयुर्वेदाप्रमाणे योगाची देखील आठ अंगे आहेत. यम ,नियम, आसन आणि प्राणायाम हे बाह्य अंगे शरीराकडे अधिक लक्ष देतात तर प्रत्याहार, धारणा ,ध्यान, समाधी हे अंतर अंगे आहे. योग मन आणि आत्मा यांच्या पातळीवर कार्य करून साधकाला मोक्षापर्यंत पोहोचवतात. मधुमेह, बीपी, कोलेस्ट्रॉल, इत्यादी सर्व रोगांवर योगासने प्राणायाम केले तर बराच फरक पडायला सुरुवात होते. त्यामुळे हृदय एकदम तंदुरुस्त बनते. योग करण्यास वयाचे बंधन नाही. चांगल्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. गिनिज बुकात बाबा रामदेव यांच्या योगा ची नोंद झाली आहे. सिनेकलावंत, नटी योगाभ्यास नियमितच करतात. योग केल्यामुळे शरीर स्वस्थ आणि मजबूत बनते. पचन क्रिया दुरुस्त होते. शरीर व मन स्वस्थ होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर सर्व शैक्षणिक आणि शासकीय कार्यालयांमध्ये व जगभर साजरा केला जातो. परंतु या वर्षी covid-19 प्रादुर्भाव असल्याने आपल्याला 21 जून योगा दिवस घरीच साजरा करायचा आहे. यंदाचा योगा दिन डिजिटल आहे. सकाळी उठून घरीच आसने, प्राणायाम करायचे आहे.
“योग असे जेथे
आरोग्य वसे तेथे”.

सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
8007664039.