१६ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२१ चे नि:शुल्क आयोजन

31

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.30डिसेंबर):– नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी,पुणे ३९ वतीने दरवर्षीप्रमाणे या १६ व्या वर्षीही राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.संपादकांनी २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती स्पर्धेला पाठवाव्या.स्पर्धेत सहभाग विनामूल्य आहे.प्रत्येक सहभागींना आकर्षक फोरकलर सन्मानपञ देण्यात येईल.विजेत्यांना सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन भव्य समारंभपुर्वक गौरविण्यात येते.

या मानाच्या स्पर्धेला दरवर्षी महाराष्टातुन प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.सर्व दिवाळी अंक संपादकांनी आपल्या दोन प्रती पुढील पत्यावर ३०जानेवारी २०२२ अखेर पर्यंत पाठवावे.

दिवाळी अंक स्पर्धा पाठविण्याचा पत्ता-
नक्षञाचं देणं काव्यमंच
राष्टीय अध्यक्ष
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे.
साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,pcmt चौक,भोसरी,पुणे -४११०३९ येथे पोहचतील अशा बेताने पाठविण्याचे आवाहान संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.