चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठविणारच–नामदार विजयभाऊ वडेट्टीवार

33

चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.20 जून) चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी असली तरी सर्वत्र राजरोसपणे दारू मिळत आहे,यात शासनाच्या महसूल बूडत असून बनावट दारू मुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याकरिता येत्या सेप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याचे दारूबंदी उठविनार असल्याचे मत पालक मंत्री नामदार विजय वडेटटीवार यांनी व्यक्त केले,ते आज (दि.20 जून) चिमुर येथील ग्रामगीता महाविद्यालयात कार्यकर्त्यां सोबत संवाद साधताना बोलत होते.

येत्या काही दिवसात शासकीय स्तरावरील विविध समित्या मध्ये महाविकास आघाडीतील पक्षातील कार्यक्रत्यांना व नेत्यांना विस्वासात घेऊन लवकरच समित्या गठीत करणार असल्याचे  नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सांगितले चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना दारुचा महापूर आहे दारू बंदी असल्याने बोगस दारू मुळे आरोग्य धोक्यात येत असून शासनाचा महसूल बुडत आहे.जिल्ह्यातील दारू बंदी उठवायची होती परंतु सध्यस्थीतीत कोरोना  महामारी असल्याने दारू बंदी उठविण्यास विलंब होत असले तरी येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू उठविणार असल्याचे ठाम सांगत आपण कोणत्याही आंदोलनास घाबरणार नसल्याचे सुद्धा सांगितले

यावेळी काग्रेस जिल्हा सरचिणीस तथा जी.प.सदस्य गजानन बुटके, सहकार नेते संजय डोंगरे, सरपंच रामदास सहारे ,न.प.उपाध्यक्ष तुषार शिंदे ,मनीष नंदेश्वर, प्रा राम राऊत, राजू लोणारे, प्रमोद दांडेकर ,सुनील दाभेकर ,माजी प.स. सदस्य ओम खैरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.