तालांगण संगीत विद्यालयाचा पुन्हा एकदा उत्कृष्ट निकाल

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.2जानेवारी):-जिल्ह्यात संगीत विषयाचे धडे देणाऱ्या एकुणच संगीत विद्यालयापैकी एक असणारे तालांगण संगीत विद्यालय, आठ ते दहा वर्षा पासुन नियमीत शिस्तबध्द संगीताचे शिक्षण देत आहे. दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील विद्यालयाचा उत्कुष्ठ निकाल लागला आहे. अखील भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुम्बई प्रमाणीत संगीत परीक्षा सत्र एप्रिल 2021 चा निकाल दिनांक 9 डीसेंबर 2021 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर घोषीत करण्यात आला. विद्यालयाचे संचालक तसेच प्रशिक्षक श्री राहुल आत्माराम आंबोरकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तबला व हार्मोनिअम ह्या विषयांची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

त्यामध्ये हार्मोनिअम विषयात पवन देशमुख तर, तबला विषयात रिदम खंडारकर, रोहण मेश्राम, मयुर चौधरी, तेजस जंगठे, पार्थ देशमुख, अमन राजगडे, निहाल चटारे व प्रणय मेडपल्लीवार विद्यार्थी होते. विशेष म्हणजे कुमार प्रणय प्रमोद मेडपल्लीवार ठरला तालांगण संगीत विद्यालयातुन पहिला संगीत विशारद आणि तबला ह्या विषयात पदवीधर प्रणय ने आपल्या यशाचे श्रेय हे आपल्या आई वडीलाना तसेच शिक्षक श्री राहुल आंबोरकर ह्याना दीले आहे. सर्व विद्यालयीन विद्यार्थी व मित्र परीवार ह्यांच्याकडुन प्रणय मेडपल्लीवार ह्याचे कौतुक केले जात आहे