बंदर(शिवापूर) ला सुरू होणार कोळसा खाण

  56

  ?प्रकल्प सुरु करण्यास वन्य प्रेमिंंचा विरोध

  चिमूर-आशीष गजभिये (विशेष प्रतिनिधी)

  चिमूर (दी:-21 जून) तालुक्यातील बंदर (शिवापूर) येथे बंदर कोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कोळसा खदान सूरु करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या मुळे बहुप्रतिक्षित असलेला हा प्रकल्प लवकरच निकाली लागणार आहे.

  चिमूर तालुक्याच्या या परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा असल्याचे सर्वेक्षनातून सामोरे आले आहे. याच भागात मुरपार येथे भूमिगत कोळसा खदान सुरू आहे. दरम्यानच्या काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बंदर(शिवापूर),शेंडेगाव,मजरा(बे.),अमरपुरी,गदगाव या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कोळसा असल्याचे केंद्रीय कोळसा विभागाच्या निदर्शनास आले होते.त्या दृष्टीने या परिसरात कोळसा खदान सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय स्तरावर प्रलंबित होता.
  या प्रस्तावा बाबत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाद्वारे वनजमिनीबाबत उपविभागीयस्तरीय समितीचा ठराव घेऊन अवहाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने केंद्र सरकारच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडून संबंधीत गावाच्या ग्रामसभेचा चालू वर्षाचा ठराव मागितला आहे. या बाबतचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असून लवकरच हा प्रलंबित प्रकल्प निकाली निघणार आहे.

  *नव्या रोजगारच्या संधी उपलब्ध होणार*
  या कोळसा खाणी साठी चिमूर तालुक्यातील बंदर(शिवापूर),शेंडेगाव,मजरा(बे.)व गदगाव या गावांच्या हद्दीतील ११७०.१६ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. परिसरात सर्वेक्षण झाले तेव्हा पासून नागरिकांत कोळसा खान सुरू होणार याची चर्चा होती. या मुळे नागरिकांना देखील रोजगार उपलब्ध होणार असल्याने प्रकल्प कधी निकाली निघतो या कडे त्यांचे लक्ष होते.
  या प्रकल्पामुळे स्थानिकांना याचा लाभ होणार असून परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

  *प्रकल्प सुरू करण्यास वन्यप्रेमींचा विरोध*
  या प्रकल्पासाठी वनजमीन अधिग्रहित करण्यात येणार असल्याने वन्यप्राण्यांच्या हवाला देत वन्यप्रेमी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी विरोध दर्शवित आहेत.विशेष म्हणजे याच परिसरात अनेक वर्षांपासून मुरपार येथे घनदाट वनक्षेत्रात भूमिगत कोळसा खान कार्यरत आहे. या नव्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामसभेचे मत जाणून घेतल्यानंतर या वर केंद्र सरकार काय भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.