जालना ख्रिसमस ट्रॉफी 2021-2022 मध्ये सतीश इलेवन संघाची बाजी

29

✒️जिल्हा प्रतिनिधी(अतुल उनवणे)

जालना(दि.4जानेवारी):-रोजी झालेल्या जालना ख्रिसमस ट्रॉफी सन 2021-2022 च्या अंतिम सामना मध्ये पोहचलेले संघ अनुक्रमे सतीश इलेवण संघ व औरंगाबाद येथील शिलोह संघ यांच्यात लढत झाली.सतीश इलेवन संघाने अंतिम सामना जिकंत ख्रिसमस ट्रॉफीवर आपले नांव कोरत इतिहास रचला.आजाद मैदान,जालना येथे ख्रिसमस ट्रॉफी चे आयोजन करण्यात आले होते.

सदरील ख्रिसमस ट्रॉफीला खुप जुना इतिहास असल्याचे यावर्षीचे आयोजन समिती चे प्रमुख शिवसेना अप्लसंख्यांक आघाडी जालनाचे भोलाभाऊ कांबळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.विशेतः सदरील ख्रिसमस ट्रॉफी क्रिकेट संघामध्ये फक्त ख्रिस्ती खरळाडूंनाच प्रवेश असल्याचे आयोजकांनी सांगितले.या ख्रिसमस ट्रॉफी चे हे वर्ष 28 वे होते,सलग 28 वर्षांपासून ख्रिसमस ट्रॉफी चे आयोजन प्रत्येक वर्षी करून क्रिकेट सामने आयोजित केले जातात असं आयोजकांनी सांगितले.

अंतिम सामन्यात पोहचलेल्या संघात विजयी संघ – सतीश इलेवन या संघाने बाजी मारत ख्रिसमस ट्रॉफी वर आपले नांव कोरले.
औरंगाबाद येथील शिलोह संघ उपविजेता ठरला.जालना येथील आझाद मैदान येथे झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात सतीश इलेवन संघास प्रथम पारितोषिक,ट्रॉफी व रोख रक्कम २८८८८ रु जालनाचे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांच्या तर्फे रोख रक्कम चे वितरण करण्यात आले.

तसेच उपविजेता संघास द्वितीय पारितोषिक,ट्रॉफी आणि १४४४४रु रोख बक्षीस देण्यात आले.तसेच विजेत्या संघास परिवर्तन फेलोशिप यांच्या तर्फे व द्वितीय संघास स्व.प्रभुदास साठे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात आली.बक्षिस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय खोतकर,भास्कर आंबेकर, युवा उद्योजक रेव्ह.सूरज रोडे, पास्टर विनोद विश्वकर्मा,पास्टर संजय जाधव,वैभव निर्मळ, रवी दानम, फेरोज लाला तांबोळी, व इतर मान्यवरांची उपस्थिती बक्षीस वितरण सोहळयास होती.