येवती येथे ब्रह्मनिष्ठ संत श्री.बाजीराव महाराज पुण्यतिथी साजरी

29

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.7जानेवारी):-तालुक्यातील येवती येथे संत श्री. बाजीराव महाराज पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ती परंपरा कायम राखत याही वर्षी दि.5 जानेवारी रोजी संत बाजीराव महाराज पुण्यतिथी अति उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम हरिभजन गावंडे महाराज यांनी संत श्री बाजीराव महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून हार अर्पन केले.

त्यानंतर उपस्थित सर्व भक्तगण व प्रतिष्ठित व्यक्तींनी पुजन करून वंदन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. हरिभजन गावंडे महाराज, खुशाल कुळसंगे, समाजसेवक पवन कुळसंगे, पोलीस पाटील संगीता मेश्राम, शालिक गोंडे, नागनाथ सुरपाम, सूर्यभान घोडाम, नारायण मंडाळे, विष्णू तोडसाम, नागोराव अरके व समस्त गावकरी उपस्थित होते.