स्वच्छ सर्वेक्षण २०२२ न.प.दिग्रस तर्फे नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक ३ दिग्रस येथे निबंध स्पर्धा व रंग भरण स्पर्धा

116

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.7जानेवारी):- नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक ३ दिग्रस या शाळेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२२ नगर परिषद तर्फे निबंध स्पर्धा व रंग भरण स्पर्धा घेण्यात आली.

या निबंध स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक कु.प्रतिक्षा सोनोने,द्वित्तीय क्रमांक कु.स्वरा इंगोले, तृतीय क्रमांक कु.जवेरिया रंग भरण स्पर्धा अ गट प्रथम क्रमांक अर्णव भोसले,द्वितीय क्रमांक अनुश्री तायडे तृतीय क्रमांक कु.योगीता झोडगे रंग भरण स्पर्धा ब गट प्रथम क्रमांक कु.आरजू परविन,द्वित्तीय क्रमांक कु.त्रीशाली मेश्राम, तृतीय क्रमांक कु.अनुष्का लाखेकर हिला मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनायक देवतळे,तर प्रमुख अतिथी म्हणून नोडल अधिकारी गौरव मांडळे, आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे ,सी टी कॉरडीनेटर कु.ढाले मॅडम, उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठ लिपिक राजेश इंगोले, बाजार निरिक्षक संतोष पाटील,संघनक परिचालक शाहिद पटेल, शिक्षक उमेश जाधव, शिक्षक पुरुषोत्तम मेश्राम इत्यादी उपस्थित होते.विद्दार्थी व सर्व पाहूणे यांनी स्वच्छ आरोग्य शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.