चामोर्शी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांचे मानधन प्रलंबित

33

🔹लाभार्थ्यांवर आर्थिक संकट

✒️भास्कर फरकडे(तालूका प्रतीनिधी चामोर्शी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.8जानेवारी):- शासनाने विकलांग, वृद्ध, निराधार महिलांना आधार देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, विकलांग निवृत्ती योजना, व विविध योजना अमलात आणल्या आहेत. चामोर्शी तालुक्यातील हजारो लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

मात्र मागील अनेक महिन्यापासून या योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित असल्यामुळे लाभार्थ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मागील अनेक महिन्यापासून काही लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्यामुळे लाभार्थी बॅंकेत, तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत त्याना शारीरिक , मानसिक ,आथीक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे