मोठी बातमी! कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध जाहीर; जाणून घ्या निर्बंध

43

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

राज्यात कोविडचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे.

👉 *जाणून घ्या निर्बंध* :

नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद

स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद

लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत

सरकारी कार्यालयात फक्त कर्मचाऱ्यांनाच परवानगी

खासगी कार्यालयात 50 टक्केच कर्मचाऱ्यांपर्यंतच उपस्थितीला परवानगी

2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार

रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू

लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.

केशकर्तनालये 50 टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र कोरोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार, याशिवाय दररोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील.

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले व RTPCR चाचणी आवश्यक.