दोन चिमुकल्यासह महिलेनी विहरीत उडी घेवून केली आत्महत्या

23

🔺मृत्यूने सर्वत्र हळहळ

🔺त्याच विहिरीत बिबट्याच्या पिल्लू चा मिळाला शव

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.9जानेवारी):-ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील महिलेने नैराश्यातून स्वतःच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 9 जानेवारी रोजी उघडकीस आली असून दिपा रवींद्र पारधी वय ( 33) वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून आयुष रवींद्र पारधी वय (6) पियुष रवींद्र पारधी वय (3) वर्ष असे मृतक बालकांचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील पती रवींद्र मुरलीधर पारधी त्यांची पत्नी दीपा रवींद्र पारधी आयुष आणि पियुष ह्या कुटुंबातील दोन मुलांसह वास्तव्याने राहत होते.
मात्र घटनेच्या आदल्या रात्री पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली. ही माहिती पती रवींद्र ला कळताच त्यांनी नातेवाईक शेजार्‍यांसह इतरत्र शोधाशोध केली असता पत्नी व दोन मुले आढळून आली नाही.

मात्र आज दिनांक 9 जानेवारीला ब्रह्मपुरी वरून मालडोंगरी कडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा आयुष व पियुष ह्या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. नेहमीच होणारे पती-पत्नीतील वादाच्या जाचाला कंटाळत नैराश्यातून ही घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जात असून परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.

ज्या विहीरीत दोन चिमुकले व माते ने आत्महत्या केली त्यांचे शव विहीरीतुन बाहेर काढत असतानाच त्याच ठिकाणी बिबट्याच्या पिल्लू ही मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली असून या प्रकरणी वनविभाग ची चमू घटनास्थळी पोहचून पंचनामा करीत आहे.