अवैध कोंबडा बाजारावर ब्रम्हपुरी पोलीसांची धाड

25

🔺एक लाख अकरा हजार दोनशे तीस रुपयेचा मुद्देमाल जप्त.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.9जानेवारी):-ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे वैनगंगा नदीच्याकाठी अवैध कोंबडा बाजार भागात भरवून त्यावर पैशाचा जुगार लावत असल्याची माहीती मिळालेवरून पो.स्टे. ब्रम्हपुरी च्या पथकाने घटनास्थळावर लपत छपत जावून धाड टाकली असता त्यामध्ये एकूण बारा आरोपीतांना कोंबडा लडाईवर जुगार खेळतांना मिळून आले.

आरोपीचे नावे, उत्तम नारायण दोनाडकर, रामसागर हरीनारायण बेदरे, दोन्ही रा. अहेर नवरगांव, ता. ब्रम्हपुरी , मानिक राजीराम सहारे , रूपचंद प्रल्हाद दिघोरे , सोपान भिमराव दिघोरे , अशोक मारोती दिघोरे , शरद देवीदास भागडकर , सुधाकर वासुदेव दिघोरे, सर्व रा. भालेश्वर, ता. ब्रम्हपुरी , यादव महादेव रडके, रा. पान्होळी, ता. नागभिड , राहुल सदाशिव रामटेकेरा गुजरी वार्ड ब्रम्हपुरी , विवेक पुंडलिक चुधरी रा. गांधी वार्ड कुरखेडा जि. गडचिरोली ,धनराज दशरथ देशमुख, रा. मौशी, ता. नागभिड असे आरोपीतांचे नाव असून त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात कोंबडा जुगारातील सहा जखमी कोंबडे, त्यांच्या लडाईसाठी वापरणात येणाऱ्या लोखंडी कात्या, एक मोटरसायकल चार सायकल, मोबाईल फोन व नगदी असा एकूण 1,11,230 /- रू चा मुद्येमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे साहेब ब्रम्हपुरी यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव पो.स्टे ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक आशिष बोरकर,पो.उप.नि सुरेंद्र उपरे, पोहेका अरूण पिसे, अशोक मांदाडे, विलास गेडाम, नापोशि सचिन बारसागडे, नितीन भगत, राहूल लाखे, धनराज नेवारे, उमेश बोरकर, नाजुक चहांदे, मुकेश गजबे, पोशि प्रमोद साबसाकडे, अनुप कबठेकर, नरेश कोडापे, दयाराम घरत, योगेश इंगोले यांचे पथकाने केली.