राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करु या!

34

12 जानेवारीला आपल्या घरातील माँ जिजाऊंचा फोटो दिसला पाहिजे आणि घरातील कँलेंडर हातात घेऊन सेल्फी काढुन जयंती साजरी करुया.आपल्या घरातल्या कँलेडरचा फोटो आणि घरात असणारया महापुरुषांचा फोटो पाठवा.

(एकाच फोटोत आपल्या घरात असणारया माँ जिजाऊंचा आणि अन्य महापुरुषांचे आणि घरातील कँलेडर हातात घेऊन फोटो पाठवा.“माझा देश माझे संविधान” सोशल मिडिया प्रस्तुत ही स्पर्धा घेण्यात येत आहे याविषयी थोडक्यात दरवर्षी आपल्या घरी किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक कँलेंडर घेत असतोच.पण तो कँलेंडर कोणता आहे?. त्या कँलेंडर मधुन आपण काय घेतो?. तो कँलेडर कोणत्या विचाराचा आहे?. हे ही तेवढेच महत्वाचे आहे.हा शुभ दिवस,तो अशुभ दिवस याबरोबर राशी भविष्य असते,पंचाग असते हे कशाला पाहिजे? आपण आणि हे सगळे तयार करणारे कालनिर्णय वाले साळगावकर आपल्यात हळुहळु ज्योतिषी पणा रुजवले आहे. शुभ दिवस अशुभ दिवस रुजवला जात आहे तिथी पाहणे आपल्याच महापुरुषांचे जन्मतारीख चुकीच्या लावणे असे आहे.सर्व प्रथम महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊ लागली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करायची कि तिथीनुसार जयंती साजरी करायाची.

पण काही सनातन्या प्रवृत्तीने शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी करायची ठरवली आणि त्यानुसार मागील कित्येक वर्षे हे कालनिर्णय,महालक्ष्मी वाले त्यांनी तयार केलेल्या या कँलेडर वर तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी अशा पध्दतीने त्यांच्या कँलेंडर मध्ये उल्लेख असतो, आणि आपण त्याचे कँलेडर घेऊन त्यानांच मोठे करतो त्यांनी फक्त लक्ष्मीचे व्रत करणारी पुस्तके आणि हे कँलेडर पासुन आपल्याला मुर्ख बनवले, कोट्यावधी रुपये कमवले आज ही आपल्या लोकांच्या घरात महालक्ष्मी,आणि कालनिर्णय दिसतो. तो कँलेडर तुम्ही घेऊ नका.आपल्या विचारांचे कँलेडर घ्या.उदा प्रबुध्द भारत कँलेंडर,धम्मयान कँलेडर घ्या.किंवा इतर बरेच कँलेडर आहे हे समतेच्या विचारांचे कँलेडर आहेत. आणि या माध्यमातुन का होईना आपण आपल्या लोकांच्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. आणि आपण घेतलेले कँलेडर ही आपल्या विचारांचे असतील,त्यामध्ये तिथी,पंचाग, राशी भविष्य नसतील, हे बघा. आणि नंतरच खरेदी करावे.याबरोबर जनजागृतीसाठी सुशिक्षिंतानी ही स्पर्धेसाठी पुढे यावे.सर्वाचे फोटो”माझा देश माझे संविधान” या फेसबुक पेज वर नावे आणि फोटो अपलोड केला जाईल.

माझे घर माझे कँलेडर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम
1) कालनिर्णय,महालक्ष्मी आणि अन्य सनातनी विचारांचे (ज्यात पंचाग राशीभविष्य,शुभ अशुभ आहेत) असे कोणतेही कँलेडर घेऊ नये.2) समतेच्या विचारांचे कँलेडर आपण घ्यावेत.3) फोटो काढताना कँलेडर आपल्या हातात घेऊन आपल्या घरातील महापुरुषांचे फोटो ही आले पाहिजेत,असा फोटो काढावा. 4)कँलेडर बरोबर फोटो काढताना घरातील एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती जरी फोटोत आल्या तरी चालतील,पण कँलेडरचे किमान नाव दिसावे आणि घरातील महापुरुषांचे फोटो दिसावे हे महत्वाचे आहे. 5) एका घरातील एकच फोटो पाठवावा,6) 12 जानेवारी माँ जिजाऊचा जन्मदिवस या दिवशीच पाठवावा.7) विजेते 26 जानेवारीला घोषित करण्यात येईल.8) विजेत्याला आँनलाईन किंवा आँफलाईन सर्टिफिकेट मिळेल. 9) या स्पर्धेसाठी कँलेडर 2022 चा पाहिजे.10) फोटो 9067047333 या नंबर वर whatsapp करावे फोटो सोबत आपले नाव आणि पत्ता पाठवा,चला बदलाची सुरवात आपल्यापासुन करुया आपण आपल्यानाच साथ देऊ या आपण आपली प्रगती करु या.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करु या!

✒️यश भालेराव(पुणे)मो:-9067047333