
नितीन रामटेके
तालुका प्रतिनिधी
मो:-8698648634
गोंडपिपरी(दि-21जून) :- तालुक्यातील कुलथा येथील एका छोट्याश्या घरात राहत असलेल्या 60 वर्षीय वृध्द महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कुलथा येथील घरात एकटी वास्तव्य करणाऱ्या शांताबाई मोतीराम मडावी यांनी रोजच्या प्रमाणे आपले सर्व घरगुती कामे करून जेवण – खावन केले. त्या घरात एकटीच राहत असल्यामुळे लवकरच कामे करायचे त्याही दिवशी आपले कामे निपटवून झोपी गेले. मात्र नियातीला वेगळेच करायचे होते. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास एका विषारी सापाने तिचा पायाला दंश केला. ती वृध्द महिला खूप घाबरली व जवळचा शेजाऱ्यांना मदतीसाठी मला वाचवा मला वाचवा असा हार्त हाक दिली. गावकरी लगेच मदतीसाठी आले. त्यांनी शांताबाई ला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल केले. ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर ला रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शांताबाई ची प्राण ज्योत मावळली. शांताबाई मडावी च्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत असून तिच्या पच्यात दोन मुली, जावई, नातवंड, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.