आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस अटक

27

🔺आरोपी पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

🔺मालडोंगरी येथील आत्महत्या प्रकरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11जानेवारी):-तालुक्यातील माल डोंगरी येथील दीपा रवींद्र पारधी वय(33)आयुष(6)पियुष ह्या चिमुकल्या दोन मुलांसह नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती सदर घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतांना सदर घटनेमागे सर्व संशयातून पती रवींद्र मुरलीधर पारधी वय (39) हे दोषी असल्याचे सर्वत्र बोलले जात होते.

याचाच तपास करीत ब्रह्मपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित मृतक पीडित पत्नीसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती नामे रवींद्र मुर्लीधर पारधी वय:- 39 वर्षे राह. मालडोंगरी यास पोलिसांनी दिनांक 10/01/2022 रोजी अटक करून त्याच्याविरुद्ध अप.क्र 17 /2022 नुसार भांदवी कलम 306, 498(अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पतीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे हे स्वतः करीत आहेत.