राष्ट्रवादी काँग्रेसने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना दिला मदतीचा हात ! माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत संदिप बेडसेंचा पुढाकार

24

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.11जानेवारी):– शिंदखेडा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने कुरुकवाडे, बाम्हणे, धमाणे याशिवाय शिंदखेडा परिसरातील वरपाडे नेवाडे गावाला जोरदार तडाखा दिला. वीजेचे खांब पडले. यासाठी इंधन, ऑईलची उपलब्धता राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांनी केली परंतु अवकाळी पावसाने अनेकांचे संसार देखील उघड्यावर आलेत. गहू हरभरा मका पपई आदी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.यामुळे आपली व्यथा मांडताना महिलांना रडू कोसळले.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्वरित दखल घेतली. अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शासकीय मदतीची वाट न पाहता माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी वैयक्तिक प्रती कुटुंब रोख दोन हजार रुपये रकमेची मदत देऊन दिलासा दिला आहे.

त्यामुळे संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबीयांचा दुःख काही अंशी तरी हलके होणार आहे. कुरुकवाडे येथे माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा बेडसे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, माजी उपसभापती शामकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुदास पाटील, निळकंठ पाटील, आनंदराव पाटील, वकील पाटील,गिरधरलाल रामराख्या, युवराज पाटील, राजेंद्र गिरासे, दिलीप पाटील, श्रीराम पाटील, कमलेश पाटील, उज्वल गोसावी, युवराज भील,शिवा भील, हेमंत जाधव, देविदास मोरे, ईश्वर पवार,दयासागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यांना मिळाली मदत..गिरासे निर्मला दिलीप, गिरासे सुरेखा दिवाणसिंग, गिरासे संजय लोटन, गुरव कल्पना सुदाम, अहिरे रमेश सखाराम,भरत शांताराम पाटील,नयन बाबूलाल पवार,गुलाब करणसिंग भील, आत्माराम भिका अहिरे, मनोहर दंगल भील, सुभाष सुरेश भील,देवा गोरख भील ,संतोष भीमा भील, जतन सुका भील, रवींद्र मंगल भील, सोनवणे बुधा एका, अहिरे नंदलाल विठ्ठल , साहेबराव वामन भील, केशव संपत पाटील,बाबूलाल तानाजी पवार, शालिग्राम गंगाराम पाटील, नरेंद्र भटू पाटील,