बेलगांव जाणी जि. प. शाळेत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12जानेवारी):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगांव जाणी शाळेत जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीकरण शिबीर दिनांक 12 जानेवारी 2022 ला पार पडले. मेंदूज्वरावर मात करण्यासाठी शासनातर्फे हे लसीकरण 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी राबविण्यात येत आहे.

शाळेतील सर्वच 52 विद्यार्थ्यांनी ही लस घेतली. याप्रसंगी बेलगांव जाणी ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर पिलारे, डॉ. तुपेकर, आरोग्य सेविका काजल फुलझेले, मुख्याध्यापक वैकुंठ टेंभुर्णे, शिक्षक सचिन परशुरामकर, आशा वर्कर अल्का रामटेके, अंगणवाडी मदतनीस नलू सडमाके आदी उपस्थित होते.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED