महाराष्ट्र संघातून दिल्ली येथे सहावी राष्ट्रीय जीत कुनो डॉ स्पर्धेत पूजा मुरादे हिस सुवर्ण पदकमिळाल्याबद्दल सायखेडा नगरीमध्येजल्लोषात स्वागत

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.13जानेवारी):-सहावी राष्ट्रीय जित कुनो डो स्पर्धेत महाराष्ट्र संघातून दिल्ली येथे सात व नऊ जानेवारी रोजी झालेल्या स्पर्धेत जीत कुनो डो स्पर्धेत पूजा दत्तू मुरादे यांना स्वर्ण पदक मिळाल्याबद्दल सायखेडा नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले .दिल्लीवरून मायभूमीत परत आल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात पूजा दत्त मुरादे या अकरा वर्षे मुलीचे सायखेडा गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली .

पूजेच्या स्वागतासाठी गावातील भाजप कार्यकर्ते जगन आप्पा कुठे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र कुटे. शिवसेनेचे कार्यकर्ते अशपाक शेठ.श्याम भाऊ जोंधळे. भाऊसाहेब कातकडे .सुरेश भाऊ कापसे भेंडाळी. अनिल शेजवळ असंख्य गावकऱ्यांनी तिचे पुष्पहार घालून फटाक्यांच्या गजरात स्वागत केले ,या वेळी पूजेचे दत्तू मुरादे यांना आनंदाश्रू वाहु लागले तिच्या पुढील भावी वाटचालीसवाट राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे निफाड तालुका संघटक व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या