म्हसवड आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

61

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

🔸संक्रांतीच्या सणानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी

🔹मास्कही दिसेनात,नियमांची पायमल्ली

म्हसवड(दि.13जानेवारी):-एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र व राज्य शासन नवनवे निर्बंध लादत आहे. पंरतु माण तालुक्यातील म्हसवड येथील बुधवारच्या आठवडा बाजारात व जनावरांच्या बाजारात कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून येते . सोशल डिस्टंसिंग तर सोडाच परंतु नागरिकांबरोबर अनेक व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर साधा मास्कही दिसून येत नाही. ” कोरोना आमच्याकडे नाहीच ” अशीच अवस्था बाजारात दिसून आली. संक्रांतीच्या सणानिमित्त म्हसवड बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

देशात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना शासन स्तरावरून कोरोनाचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी नवे निर्बंध लादले जात आहेत. याचबरोबर प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक भागात रात्रीच्या संचारबंदी बरोबर दिवसाही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु याउलट कोरोना संसर्गाला रोखण्याची आमची जबाबदारी नाहीच , अशा अविर्भावात म्हसवड येथील बुधवारच्या आठवडा बाजारात अनेकजण विनामास्क फिरताना दिसून आले, अनेक नागरिकांबरोबर रस्त्यावर बसणाऱ्या अनेक विक्रेत्यांनीही मास्क लावलेला दिसून आला नाही. म्हसवड येथील जनावरांचा हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार भरतो . त्यामुळे बाजारामध्ये अनेक ठिकाणी हुन पशुपालक व व्यापारी येत असतात . पंरतु जनावरांच्या बाजारातही कोरोना नियम पायदळी तुडवलेले दिसून येते. असे आठवडे बाजारात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे.

निर्बधाबाबत भिती , मात्र नियमांची पायमल्ली राज्य व केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्गात वाढ होऊ नये म्हणून नवे निर्बंध लावत आहे. शासनाकडून प्रत्येक नागरिकांनी , नियमांचे पालन करावे असे आवर्जून सांगितले जाते. मात्र शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. दुकानदारांना, व्यापाऱ्यांना निर्बधाबाबत भिती वाटते. तेच व्यापारी कोरोनाचे नियम पालन करीत नसल्याचे दिसून येतात. आता लाँकडाऊन पडणार की काय याबाबत चर्चा सुरू होते. मात्र चर्चा करणारेच कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते.