चंद्रपुर जिल्ह्यात दिल्लीवरून आलेला तरूण पॉझिटीव्ह

    39

    चंद्रपुर(पुरोगामी संदेश)

    चंद्रपूर(दि-21जून) जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट येथील २६ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली येथून २० जून रोजी परत आलेल्या या युवकाने नागपूर एअरपोर्टवरून थेट शकुंतला लॉन येथे येत तपासणी केली होती. नवी दिल्ली येथे असताना त्याला तापाची लक्षणे होती. त्यामुळे शकुंतला लॉन येथून तपासणी केल्यानंतर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. २१ तारखेला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा युवक सध्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
    चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) आणि २१जून ( एक बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ५६ झाले आहेत.आतापर्यत ४३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ५६ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १३ झाली आहे.